Uncategorized

औरंगाबाद : काळ्या पाषाणातील भक्ती गणेश सिडको-हडको वासियांचे आराध्य दैवत 

अविनाश सुतार

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादेतील काळा गणपती हे सिडको-हडको वासियांचे आराध्य दैवत मानले जाते. शहरातील एकमेव असलेल्या काळया पाषाणातील गणेश अशी या गणपतीची ख्याती आहे. सध्या गणेशोत्सव निमित्ताने बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. एरवी सुद्धा दररोज तसेच गणेश चतुर्थीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

काळ्या गणेशमुर्ती बद्दल भक्ती गणेश ट्रस्टचे कोषाध्यक्ष अनंत कुलकर्णी म्हणाले, औरंगाबाद शहरात काळ्या पाषाणात असलेली ही एकमेव मुर्ती, त्यामुळे यास काळा गणपती असे म्हणतात. तामिळनाडू राज्यातील महाबलीपुरम येथील हस्तकला केंद्रातून काळ्या पाषाणातील अडीच फुटांची मूर्ती आणण्यात आली आहे. गाभाऱ्यात चांदीचा वर्क करण्यात आला असून, मंदिर परिसरात मार्बल लावण्यात आले आहे. इमारतीत तीन सभागृह असून विविध धार्मिक कार्यक्रमासह योगसन, भरतनाट्यमसह अन्य प्रशिक्षणवर्ग येथे नियमित घेतले जातात.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT