Uncategorized

औरंगाबाद : नाथषष्ठी सोहळ्यासाठी दिंड्याच्या आगमनाने पाचोड परिसर दणाणला

अविनाश सुतार

पाचोड, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी टाळमृदंगाचा खणखणाट अन् 'भानुदास एकनाथ'चा जयघोषात ऊन, वाऱ्याची पर्वा न करता वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल होऊ लागल्या आहेत. शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत दिंड्या येण्यास सुरूवात झाली आहे.

पाचोड (ता.पैठण) परिसर असंख्य  दिंड्यांच्या आगमनाने  दणाणला गेला असून, टाळमृदंग तसेच हातात भगवे पताका घेत 'एकनाथ महाराज की जय' असा जयघोष करत दिंड्यासोबत आलेले भाविक पैठणकडे आगेकूच करताना दिसत आहे. दोन वर्षानंतर  पाचोड- पैठण रस्त्यावर दिंड्यांत सहभागी झालेले भाविक दिसून येत आहेत.

खामगाव, जालना, भोकरदन, अंबड, घनसांवगी, परतूर, सिल्लोड, कुंभार-पिंपळगाव, फुलंब्री, सोयगाव आदी ठिकाणांहून दिंड्या पाचोड मार्गे पैठणकडे रवाना होत आहेत.  त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे. ग्रामस्थांकडून भाविकांच्‍या राहण्यासह खाण्यापिण्याची सोय केली जात आहे.

विशेष म्हणजे अनेक दिंड्या राञी मुकामी  असल्याने धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. त्यामुळे गावागावांत भक्तीभावाचे सूर कानी येत असून वातावरणात भक्‍तीमय झाले आहे.

 हेही वाचलंत का ? 

पाहा व्हिडीओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT