Uncategorized

औरंगाबाद : वडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आ. संजय शिरसाठ गटाचे वर्चस्व

अविनाश सुतार

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आ. संजय शिरसाट यांच्या हिंदूह्रदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलने ग्रामपंचायतीच्या १७ जांगांपैकी ११ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शिवशाही निष्ठावंत पॅनलला ४ तर भाजपाच्या परिवर्तन पॅनलला २ जागेवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत मात्र रमेश गायकवाड यांच्या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लोकशाही ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना एकही जागा जिंकता आली नाही.

वडगाव ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी गुरुवारी (दि.४) मतदान झाले. या निवडणुकीत ७२ उमेदवार रिंगणात होते. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास सर्व जागांचे निकाल हाती आले.

या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १ मधून सुनील चंद्रकांत काळे, सुनीता राजेश साळे, छायाबाई सोमनाथ प्रधान, वॉर्ड क्रमांक-२ मधून माधुरी राजन सोमासे, विष्णू रतन उगले, वॉर्ड क्रमांक-३ मधून राणी रामकिसन पाटोळे, वॉर्ड क्रमांक-४ मध्ये सुरेखा अशोक लगड, पूनम प्रकाश भोसले, तर वॉर्ड क्रमांक-६ मध्ये ज्योती श्रीकांत साळे, उषाताई पोपट हांडे व रामदास उत्तम गवळी असे ११ उमेदवार हिंदूह्रदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलचे विजयी झाले.

तर, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शिवशाही निष्ठावंत पॅनलच्या कमल कल्याणराव गरड, मंदा कैलास भोकरे, विजय दत्तराव सरकटे यांनी वॉर्ड क्रमांक-५ मधील तिन्ही जागेवर विजय मिळविला तर सागर पितांबर शिंदे हे वॉर्ड क्रमांक-३ मधून विजयी झाले. तर भाजपाच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार वॉर्ड क्रमांक-३ मधील उमेदवार माया सतीश पाटील व वॉर्ड क्रमांक -४ मधून संभाजी हौसराव चौधरी हे दोन जण निवडून आले. या निवडणुकीत आमदार संजय शिरसाठ गटाने ११ जागा जिंकून बहुमत मिळविल्याने सरपंच आमच्या हिंदूह्रदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलचा होईल. असे हनुमान भोंडवे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT