Uncategorized

Abhishek Ghosalkar Firing Case | ‘अशा’ घटना महाराष्ट्रात घडायला नकोत : अजित पवार 

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे (UBT) नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार बोलताना म्हणाले की, "अशी घटना महाराष्ट्रात घडायला नको होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सरकारला बदनाम करण्याचा आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा मुद्दा विरोधकांना सापडला आहे हे मी नाकारत नाही, " (Abhishek Ghosalkar Murder)

Abhishek Ghosalkar Murder : गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी 

 नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत माध्यमांशी बोलत असताना अजित पवार म्हणाले, "अशी घटना महाराष्ट्रात घडायला नको होती.  दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. असा प्रकार घडला तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे." पुढे बोलत असताना ते म्हणाले की, "सरकारला बदनाम करण्याचा आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा मुद्दा विरोधकांना सापडला आहे हे मी नाकारत नाही, पण या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमीही हवी. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही बैठक झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे."

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार आणि उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांची गुरुवारी संध्याकाळी 'फेसबुक लाईव्ह' वर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा हा एकेकाळचा शत्रू अचानक मित्र बनला आणि आपल्या घरी कार्यक्रमाला निमंत्रित करून त्यानेच अभिषेक यांचा घात केला. हा घातपात घडवल्यानंतर मॉरिसनेही स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT