Uncategorized

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

अविनाश सुतार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा:  भाजप सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका महिलेने हॉटेलच्या रुममध्ये फोनवर एक व्हिडिओ शूट केला होता.  तिने देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. हे प्रकरण विवाहबाह्य संबंध असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे. श्रीकांत देशमुख आणि पीडित महिला यांचे कथित संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर देशमुख यांनी पदावरचा राजीनामा दिला होता. आता या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT