Uncategorized

औरंगाबाद : शेतात काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल

अनुराधा कोरवी

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतात काम करणाऱ्या पन्नास वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बिडकीन पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध शुक्रवारी (दि.२३ ) रात्री गुन्हा दाखल केली आहे. सदर व्यक्तीचे नाव रशीद खाँ. हसन पठाण ( रा. शिवनाई ) असे आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.२३ डिसेंबर) पन्नास वर्षीय महिला शेतशिवारात कापूस वेचत असताना तिच्यावर अत्याचार झाला. यानंतर सदरील महिलेचे तोंड दाबून व मारण्याची धमकी देऊन तिच्यावर पठाणने अत्याचार केल्याची तक्रार रात्री उशिरा बिडकीन पोलीस ठाण्यात दिली. यानंतर बिडकीन पोलिसांनी संशयित आरोपी रशीद खाँ. हसन पठाण ( रा. शिवनाई ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, सपोनि संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे, पिंकू पथकाचे पोना संतोष तोडकर हे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT