औरंगाबाद अपघात 
Uncategorized

औरंगाबाद-पुणे महामार्गावरील अपघातात २ महाविद्यालयीन तरुण ठार

अविनाश सुतार

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद- पुणे महामार्गावरील भेंडाळा फाट्याजवळ ट्रक आणि मोटारसायकलचा आज (दि.३) सकाळी सहाच्या सुमारास झालेल्‍या भीषण अपघातात दोन महाविद्यालयीन तरुण ठार झाले. आदित्य रामनाथ सुंब (वय २०, रा. मांजरी, सध्या रा. शिवाजीनगर, गंगापूर ), यश (नयन) भाऊसाहेब शेंगुळे (वय २०, रा. जयसिंगनगर, गंगापूर) अशी त्‍यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य आणि यश आज सकाळी मोटारसायकलवरून (क्रमांक एम एच २० ई एक्स ६०४८) गंगापूरहुन औरंगाबाद येथे कॉलेजला जात होते. यावेळी भेंडाळा फाट्याजवळ नाशिक येथून हैद्राबादला जाणारा ट्रक (क्रमांक के ए -५६ – ४१२३) आणि मोटारसायकलमध्ये जोराची धडक झाली. या अपघातात दाेघांचाही जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस काँन्स्टेबल राहुल वडमारे घटनास्थळी दाखल झाले.

आदित्‍यच्‍या इंस्‍टावरील 'त्‍या' व्हिडिओची चर्चा

आदित्‍य आणि यश हे मित्र होते. दोघांच्या पार्थिवावर गंगापूर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे आदित्य सुंब याने गंगापूरमध्ये एक व्हिडिओ अपलोड करून इंस्टाग्रामवर टाकला होता. त्यात त्यांनी 'सगळे टेन्शन संपले, येथेच यायचं', असे व्हिडिओत म्हटले होते. दोघेही आई-वडिलांना एकुलते एकच होते. या घटनेमुळे गंगापूर व मांजरी गावात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT