Latest

Umesh Pal murder Case : उमेश पाल हत्या प्रकरणी अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: उमेश पाल अपहरण प्रकरणात प्रयागराज 'एमपीएमएलए' न्यायालयाने संशयित आरोपी, माफिया अतिक अहमद याला आज (दि.२८) न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो बहुजन समाज पक्षाचे नेते राजू पाल यांच्‍या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या उमेश पाल अपहरण प्रकरणातील संशयित आरोपी होता.   दरम्यान न्यायालायाने आरोपी अतिक अहमदला ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

प्रयागराज 'एमपीएमएलए' न्यायालयाने तब्बल सात वर्षानंतर याप्रकणात महत्त्वाची सुनावणी करत मोठा निर्णय दिला आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने संशयित आरोपी अतिक अहमदसह दिनेश पासी आणि खान सौलत हनिफ यांना दोषी ठरवले. तर अतिक अहमदचा भाऊ अश्रफसह इतर सातजणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश पोलीस आपणास इन्काउंटरमध्ये ठार मारतील, अशी भीती व्यक्त करीत अतिक अहमद याने सर्वोच्च न्यायालयाकडे संरक्षण मागितले होते. मात्र सर्वोच्‍च न्‍यायालयाने त्‍याची याचिका फेटाळली. बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल  याच्या हत्येप्रकरणी अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. अतिक अहमद याला आझ नैनी कारागृहातून न्यायालयात आणत यावर सुनावणी घेतली. दरम्यान उमेश पाल हत्याप्रकरणी आपल्या कुटुंबाला जाणीवपूर्वक गुंतवण्यात आले आहे, असा दावाही अतिकने याचिकेत केला आहे.

Umesh Pal murder Case : काय आहे प्रकरण?

उमेश पाल हा  २००५ मध्ये बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार होता. फेब्रुवारी २०२३ मध्ये  उमेश पाल आणि त्याचा सुरक्षारक्षक संदीप निषाद यांची धुमानगंजमध्ये गोळ्या झाडून  हत्या करण्यात आली होती. उमेश न्यायालयातून घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. उमेश आपल्या घरासमोर कारमधून खाली उतरताच शुटरनी त्यांना चारही बाजूंनी घेरले आणि गोळीबार केला. यानंतर बॉम्बस्फोटही घडवून आणला होता. उमेश पाल आणि पोलीस कॉन्‍स्‍टेबल संदीप निषाद यांचा जागीच मृत्यू झाला होता. सुरक्षा रक्षक राघवेंद्र गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्‍यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अतिक अहमदचे नाव समोर आले आहे. यानंतर या प्रकरणात अतिक, अशरफ, अतिकचा मुलगा आणि त्याची पत्नी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT