Latest

T-shirt auction : युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या टी-शर्टचा ८५ लाखांना लिलाव

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी लंडनच्या एका चॅरिटीच्या लिलावामध्ये आपला प्रसिद्ध खाकी टी-शर्ट ९० हजार डाॅलर्सला म्हणजे ८५ लाख ४३ हजार ५०५ रुपयांना विकला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन युक्रेन दुतावासाद्वारे टेट माॅर्डनमध्ये ६ मे रोजी केले होते. टी-शर्टची किंमत ही ५० हजारांपर्यंत निर्धारित करण्यात आली होती. ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी खरेदीदारांना जास्तीतजास्त बोली लावावी म्हणून विनंती केली होती. (T-shirt auction)

लिलावापूर्वी झेलेन्स्की हे व्हर्च्युअलपणे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. झेलेन्स्की म्हणाले की, "रशियन सैन्याने रुग्णालये आणि प्रसुती रुग्णालये आणि ४०० आरोग्य केंद्र उद्ध्वस्त केली आहे. टेट माॅडर्नने युक्रेनबरोबर एकता असल्याची दाखवले आहे. टेट युक्रेनच्या लोकांनी रशियाच्या आक्रमणाची निंदा केलेली आहे. रशियाने लवकरात लवकर युक्रेनमधून बाहेर पडावे, यासाठी अभियान चालवत आहेत." (T-shirt auction)

झेलेन्स्की आपल्या भाषणात म्हणाले की, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून रशियाच्या विरोधात प्रतिबंध लावणे आणि युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्याचा आग्रह केला होता. उपस्थित अमेरिकन काॅंग्रेस सदस्यांनी झेलेन्स्कीच्या या भाषणाला स्टॅडिंग ओवेशन देऊन दुजोरा दिला. मात्र, यावेळी पीटर शिफ यांनी ट्विट केले की, "मी समजतो की, ही वेळ कठीण आहे. पण, युक्रेनच्या राष्ट्रपतीकडे सूट नाही का? अमेरिकेच्या सदस्यांसमोर हा लिलाव व्हावा, हा काही मोठा सन्मान नाही."

पहा व्हिडीओ : … आणि तो रस्त्यावर गुडघे टेकून बसला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT