Latest

उद्धवजी गेट वेल सून, उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचा पलटवार

गणेश सोनवणे

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क – महाराष्ट्राला फडतूस व मनोरुग्ण गृहमंत्री लाभला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. अशा प्रकारे गुंड लोकांच्या पाठिमागे सरकार उभे राहिले तर राज्यात खून-खराबे वाढतील असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांची भाषा व शब्द पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे ठाम मत माझे झाले आहे. उद्धवजी गेट वेल सून एवढच मी आता प्रार्थना करु शकतो अशी टीका त्यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात घडणाऱ्या घडामोंडीवर बोलताना ते म्हणाले राज्यात घडलेल्या घटना वैमन्यस्यातून घडलेल्या गोष्टी आहेत. त्या घटनांचा राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेशी संबध जोडणे अयोग्य होईल. ज्या काही दोन-तीन घटना घडल्या आहेत, त्यामागे व्यक्तिगत कारणं आहेत. एकमेकांशी त्यांचे हवेदावे आहेत, मात्र त्याही बाबतीत आम्ही कडक कारवाई करणार आहोत.

गोपिचंद जासूस, जग्गा जासूस तयार झालेत

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाच्या महिला किंवा प्रवक्त्याचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यावर विचारले असता विजय वडेट्टीवारांना फार काही माहिती नसते. ते मध्येच काहीतरी सणसणाटी गोष्टी बोलत असतात. यासर्व प्रकरणांची चौकशी होणारच आहे. पण विनाकारण अलीकडच्या काळात गोपिचंद जासूस, जग्गा जासूस तयार झालेत त्यांनी जरा विचारपूर्वक बोलावं असेही फडणवीस म्हणाले.

भुजबळांची योग्य काळजी घेऊ

छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, त्यासंदर्भात बोलताना आम्ही भुजबळांना संरक्षण दिले आहे. मध्यतंरीच्या काळात त्यांना ज्या धमक्या आल्या आहेत. त्यानुसार त्यांच्या सिक्युरीटीचे रिव्ह्यू घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे योग्य काळजी सरकारच्या वतीने घेतली आहे असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT