सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले एकमेकांपासून फटकून असतात. अजित पवार उदयनराजेंवर फारशी टीका करताना दिसत नाही. परंतु अजित पवार यांनी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उदयनराजेंवर टीका केली आहे. या टीकेला उदयनराजे यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर (Ajit pawar v/s Udayanraje) दिले आहे.
(Ajit pawar v/s Udayanraje) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारच्या एमआयडीसीत खंडण्या कोण मागतयं, ते बघा, असे म्हणून भाजपचे खासदार उदयनराजे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. यावर खासदार उदयनराजे यांनी कडक शब्दांत प्रतिउत्तर दिले आहे. हिंमत असेल तर आपण दोघे ही एकत्र ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ या, असे आव्हान उदयनराजे यांनी अजित पवारांना दिले आहे.
हेही वाचलंत का ?