मडगाव; पुढारी वृत्तसेवा : सुरावली येथे भरधाव कारच्या धडकेने नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून कोलवा पोलिसांनी याप्रकरणी क्रेग रॉड्रगीस याला अटक केली आहे.
रात्री १२ ते साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. यावेळी शैलेश गावकर (बाळी, केपे) आणि विश्वास देयकर (आंबावली, केपे) हे पोलीस कॉन्स्टेबल सुरावली येथे ड्युटीवर तैनात होते. या घटनेत शैलेश याचा जागीच मृत्यू झाला तर विश्वास याचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तपास प्राथमिक अवस्थेत असल्याने पोलिसांनी अधिक माहिती देणे टाळले, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचलत का?