पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडमधील गिरिडीह येथे शनिवारी (दि. ५) प्रवाशांसह बस नदीत पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आणखी काही लोक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात असून बचावकार्य सुरू आहे. काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. इंडिया टुडे या वृत्तसंस्थेने या घटनेची माहिती दिली आहे. (Jharkhand Bus Accident)
झारखंडमधील डुमरी गावाजवळील बाराकर नदीत ही बस पडली. रांचीहून गिरिडीहला जाणाऱ्या या बसमध्ये ३० लोक असल्याची चर्चा आहे. गिरीडीह-डुमरी मार्गावर पुलाचे पट्टे तोडून ही बस ५० फूट खोल नदीत बस पडल्याने हा अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेनंतर पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर, गिरिडीहचे आमदार सुदिव्य कुमार आणि डीसी नमन प्रियेश लाक्रा हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हेही वाचा