नगर : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील बेनवडी शिवारामध्ये धुमाळ वस्ती येथे आज (मंगळवार दि. २८) सकाळी सचिन हनुमंत धुमाळ व अमोल हनुमंत धुमाळ या दोन सख्ख्या भावांचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
त्याबाबत घडलेली घटना अशी की कर्जत तालुक्यातील बेनवडी शिवारामध्ये धुमाळ वस्ती येथे राहत असलेले सचिन हनुमंत धुमाळ वय 22 वर्ष हे गाईंची धार काढून रात्री दूध शेडवर बादलीत ठेवलेले होते ही शेडला अडकवलेली बादली काढत असताना त्या बादलीमध्ये विजेचा प्रवाह उतरलेला होता. त्यांना विजेचा धक्का बसला आणि ते ओरडले असता यानंतर त्यांचा सख्खा भाऊ अमोल हनुमंत धुमाळ वय 25 वर्ष हा त्यांच्या मदतीला गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसला आणि दोघे भाऊ जागीच मरण पावले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.