Twinkle Khanna 
Latest

Twinkle Khanna : ट्विंकलची सायकल खांबाला धडकते तेव्हा..! (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना ( Twinkle Khanna ) हे एक बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपे आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. ट्विंकलच्या वाढदिवसानिमित्त दोघेही मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी गेले. त्यावेळचे तेथील दोघांचे व्हिडीओ आणि फोटो चर्चेत आले होते; मात्र सध्या त्यांच्या एका व्हिडीओने चाहत्याचे लक्ष वेधले आहे.

संबंधित बातम्या 

ट्विंकलने ( Twinkle Khanna ) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ट्विंकल सायकलिंग करताना दिसत आहे. याचदरम्यान अचानक तिचा तोल जातो आणि सायकल एका खांबाला जाऊन धडकते. हे पाहून अक्षय कुमार जोरजोरात हसायला लागतो आणि ट्विंकलही हसत असल्याचे दिसून येते.

'माझी सायकल खांबाला धडकणे- सोडले, तर ही ट्रिप खूप छान. अगदी खरोखरच स्वर्गात गेल्यासारखे वाटले. तुमच्याकडे नवीन वर्षासाठी कोणतेही मोठे संकल्प असतील तर ते खाली कमेंटमध्ये शेअर करा आणि इतरांना प्रेरणा द्या, अशी कॅप्शन ट्विंकलने व्हिडीओला दिली आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना आवडला असून, त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT