Bhumi Pednekar : भूमी पेडणेकर बनली पत्रकार!

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकर बनली पत्रकार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'दम लगा के हईशा' पासूनच भूमी पेडणेकरने ( Bhumi Pednekar ) अनेक चांगल्या भूमिका, चित्रपट केले आहेत. आता तिने आगामी 'भक्षक' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यामध्ये ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसून येईल.

संबंधित बातम्या 

निर्मात्यांनी 2 वर्षांपूर्वी 2022 मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाची कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे आणि ती महिलांवर होणार्‍या गुन्ह्यांच्या वास्तवाशीदेखील संबंधित आहे. शाहरूख खानने बिहारमधील वास्तविक घटनांवर आधारित 'भक्षक' हा गंभीर थ्रिलर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटाचे शूटिंग कोविडच्या काळात सुरू झाले होते आणि त्याचे शूटिंग 2022 मध्येच पूर्ण झाले होते. आता हा चित्रपट रिलीज होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

'भक्षक'मध्ये भूमीशिवाय अभिनेता संजय मिश्राही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2 तास 16 मिनिटे 47 सेकंदांचा आहे. हा चित्रपट मार्च किंवा एप्रिलमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. पुलकितने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ( Bhumi Pednekar )

वृत्तानुसार, 'भक्षक' हा बिहारच्या वादग्रस्त मुझफ्फरपूर शेल्टर होम प्रकरणावर आधारित क्राईम थ्रिलर चित्रपट असेल. या शेल्टर होममध्ये राहणार्‍या डझनभर असहाय मुलींवर अत्याचार, बलात्कार आणि अत्याचार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. देशभरात संताप आणि निषेध झाल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हे प्रकरण आपल्या हातात घेतले. 2020 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 'भक्षक' चित्रपटात भूमीची भूमिका जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

यापूर्वी हे पात्र शाहरूख खानच साकारणार होता; पण त्याच काळात कोविड आला होता. त्यानंतर त्याच्या 'पठाण' आणि 'जवान' या इतर बिग बजेट चित्रपटांचे शूटिंग सुरू झाले. त्यानंतर शाहरूखच्या प्रोडक्शन हाऊसने भूमी पेडणेकरला चित्रपटात पुरुषाऐवजी महिला पत्रकाराची भूमिका बदलून दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news