पुढारी ऑनलाईन डेस्क : जुळ्या बहिणी पण जन्म मात्र वेगवेगळ्या वर्षात वेगवेगळ्या दिवशी झाले. हे वाचून तुमच्या भुवया उंचावल्या असतील. तसेच असे कसे घडलं? असा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल; पण वास्तवात ही घटना घडली आहे. अमेरिकेतील टेक्सास शहरात. टेक्सासमधील एका दाम्पत्याला जुळ्या मुली झाल्या आहेत. त्या जुळ्या मुली (Twin Girl ) वेगवेगळ्या वर्षांत वेगवेगळ्या दिवशी जन्मलेल्या आहेत. अॅनी जो आणि एफी रोझ असे त्यांचे नावे आहेत
माहीतीनूसार,अमेरिकेतील टेक्सास शहरातील एका महिलेला जुळ्या मुली झाल्या.जुळ्या मुलींची नावे अॅनी जो आणि एफी रोझ अशी आहेत. या जुळ्या बहिणीतील एकीचा जन्म २०२२ मध्ये तर दुसरीचा जन्म काही मिनिटांनी २०२३ वर्षात झाला.
न्यूयॉर्क पोस्टने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार , सरत वर्ष आणि नवीन वर्षाच्या दरम्यान जुळया मुलींचा जन्म झाला. काली जो स्कॉट या अमेरिकन महिलेने रात्री ११:५५ वाजता तिच्या पहिल्या मुलीला , जन्म दिला. ३१ डिसेंबर रोजी आणि त्यानंतर १ जानेवारी रोजी सकाळी १२.०१ वाजता तिची दुसर्या मुलीला जन्म दिला. अॅनी जो आणि एफी रोझला अशी त्यांची नावे आहेत.
या जुळ्या मुलींची आई असलेल्या काली जो हिने फेसबुकवर तिच्या बाळांच्या आणि पतीच्या फोटोंसह एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले आहे की, "क्लिफ (काली जोचा पती) आणि मला अॅनी जो आणि एफी रोज स्कॉटची ओळख करून देताना खूप अभिमान वाटतोय! ते दोघेही निरोगी आणि आनंदी आहेत. आणि 5.5 पौंड वजन आहे.
हेही वाचा