Latest

Tunisia Firing Incident : ट्युनिशियात जेरबा सिनेगॉगजवळ गोळीबार; ४ ठार

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Tunisia Firing Incident : ट्युनिशियातील जेरबा येथे जेरबा सिनेगॉग म्हणून ओळखल्या जाणार्‍या एल घ्रिबा सिनेगॉगजवळ मंगळवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चार जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन अभ्यागत आणि दोन सुरक्षारक्षक आहेत. जेरुसलेम पोस्टच्या हवाल्याने एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

ट्युनिशियातील Tunisia Firing Incident प्राचीन एल घिबा सिनेगॉगमध्ये यहुदी लोकांची देवता सुलेमान यांच्या लॅग बाओमर नावाची यात्रा सुरू आहे. "पॅसओव्हरच्या 33 दिवसांनंतर सुरू होणार्‍या वार्षिक पाच दिवसांसाठी तीर्थयात्रा सुरू होते. त्यासाठी तिथे जगभरातील हजारो यहुदी यात्रेसाठी आले आहेत, अशी माहिती जेरुसलेम पोस्टने ला क्रोइक्स न्यूज साइटच्या हवाल्याने दिली.

बातम्यांनुसार, ल घिबा सिनेगॉगच्या यात्रेच्या दिवसांमध्ये, "जेथे सोलोमनचे मंदिर आहे असे मानले जाते त्या छोट्या गुहेत प्रवेश करण्यापूर्वी यहुदी मेणबत्त्या पेटवतात." ज्यू नंतर प्रार्थनेभोवती सुका मेवा आणि मिठाईची देवाणघेवाण करतात. Tunisia Firing Incident

त्यानंतर मंगळवारी या ठिकाणी गोळीबार करण्यात आला. यावेळी तेथील समुदायाच्या आयतान नावाच्या सदस्याने सांगितले की, "येथे मोठी दहशत आहे. आम्ही सिनेगॉगमध्ये आणि सिनेगॉगजवळील गेस्टहाऊसमध्ये लॉकडाउनमध्ये आहोत," जेरुसलेम पोस्टने वृत्त दिले आहे.

पुढे आयतानने ट्विट केले की, Tunisia Firing Incident हल्ला सुरू होऊन तासापेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर हल्ला अजून संपला नसल्याची माहिती दिली. तो पुढे म्हणाला, "आम्हाला [बंदुकीच्या] गोळ्या ऐकू येत आहेत. तेथे मृत लोक आहेत. आम्ही अजूनही सिनेगॉगमध्ये वेढलेले आहोत. सर्व काही ठीक होईल अशी आशा करूया. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा,"

Tunisia Firing Incident : मारेकऱ्याचा हेतू शोधण्यासाठी तपास सुरू – गृहमंत्रालय, ट्युनिशिया

घटनेविषयी ट्युनिशियाच्या गृहमंत्रालयाने सांगितले की, जेरबा येथील नॅशनल गार्डच्या नौदल केंद्रातील एका रक्षकाने त्याच्या एका सहकाऱ्याची हत्या केली आणि नंतर एल घिबा सिनेगॉगकडे निघाले. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार गार्डने सिनेगॉगमधील सुरक्षा रक्षकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि त्याला ठार मारले, असे पुढे म्हटले आहे.

ट्युनिशियाच्या गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सिनेगॉगला घेराव घालून सुरक्षित करण्यात आले आहे. ट्युनिशियाच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, मारेकऱ्याचा हेतू शोधण्यासाठी तपास केला जात आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT