Tunisha Sharma  
Latest

Tunisha Sharma Last Rites: अभिनेत्री तुनिषा शर्मा पंचतत्वात विलीन, अंत्यसंस्कारावेळी शीझानची आई-बहिण उपस्थित (Videos)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर गोडदेव स्मशानघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या मामाने मुखाग्नी दिली. (Tunisha Sharma Last Rites) ज्या रुग्णवाहिकेतून तुनिषाचे पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले आहे, त्या रुग्णवाहिकेला फुलांच्या माळांनी सजवले होते. गाडीच्या पुढे तुनिषाचा फोटोदेखील लावण्यात आला होता. अंत्यसंस्कारावेळी शीझानची आई आणि बहिण उपस्थित होती. यावेळी दोघी रडताना दिसल्या. दरम्यान, अंत्यसंस्कारावेळी तुनिषाची आई वनिता शर्मा बेशुद्ध झाल्या होत्या. (Tunisha Sharma Last Rites)

शीझानच्या वकिलांनी दिलं स्टेटमेंट

तुनिषा शर्मा प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शीझान खानच्या वकिलाने स्टेटमेंट जारी केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, तुनिषा आणि शीझान एकमेकांपासून वेगळे झाले होते. याचा ठोस पुरावा आहे.

तुनिषा घरी पोहोचला होता अभिनेता कंवर ढिल्लों

तुनिषाचा मित्र आणि तिचा माजी सहकलाकार कंवर ढिल्लों तिच्या घरी संवेदना व्यक्त करण्यासाठी पोहोचला होता. त्याने त्याच्या सोशल मीडिय़ा अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

(videos-manav. manglani and viralbhayani instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT