अक्षया-हार्दिक  
Latest

‘तुझ्यात जीव रंगला’ कायमचा! अक्षया-हार्दिक यांच्या लग्नातील पहा नवे फोटो

स्वालिया न. शिकलगार

'पुढारी ऑनलाईन डेस्क : तुझ्यात जीव रंगला कायमचा' म्हणत अक्षया देवधर (पाठकबाई)ने इन्स्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत. आज अक्षया अभिनेता हार्दिक जोशीसोबत लग्नबंधनात अडकली. याआधी दोघांच्या लग्नातील विधीचे फोटो समोर आले होते. आता लग्न संपन्न झाल्यानंतरचे फोटो समोर आले आहेत. अक्षयाने हार्दिकसोबतचा फोटो शेअर करताना लिहिले आहे- 2.12.2022 ❤️ तुझ्यात जीव रंगला… कायमचा..!✨ #अहा. 

या फोटोवर ऋचा आपटेने Love you ?? अशी कमेंट दिलीय. तसेच चाहत्यांनी हार्दिक-अक्षयाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता अमोल नाईकने त्यांना ❤️❤️❤️❤️? अशी हार्ट इमोजी सेंड केलीय. तर चाहत्यांनी ?❤️?, ?♾♾, Congratulations ?, Congratulations both ❤️, Congratulations ?, ongratulations Anjali Bai & Rana da ❤️??, Favt favt favt ?❤️congratulations guyes, Congratulations to my favorite couple ❤️??, Best couples ❤️❤️, Best caption ever❤️?, Congratulations ?, happy married life❤️?, Congratulations Dear Akshya/Pathak Mam Happy married life Both of you ?, ????loviee dubiee❤️, Congratulations both of u ❤️,Happy marriage life both of you be always happy ❤️? त्यांना शूप सारे हार्ट इमोजी, फायर इमोजी पाठवत शुभेच्छांचा वर्षाव केलाय. (अक्षया-हार्दिक)

हार्दिक आणि अक्षया दोघेही तुझ्यात जीव रंगला या मराठी मालिकेत दिसले होते. दोघांनी अनुक्रमे राणा दा आणि पाठकबाई या भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेत दोघांनी पती-पत्नीची भूमिका केली होती. पडद्यावर ही भूमिका साकारणारे दोघे कलाकार आता रिअल लाईफमध्ये एकमेकांचे जोडीदार बनले आहेत. 

याआधी दोघांचे संगीत, हळद आणि मेहंदी सोहळ्यातील फोटो व्हायरल झाले होते. त्याशिवाय हळदीचे आणि संगीत सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. देवधर आणि जोशी यांच्या घरी वैयक्तिक हळद सोहळा पार पडला. त्याचबरोबर या जोडीचा सामूहिक सोहळादेखील पार पडला. (अक्षया-हार्दिक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT