तुजं माजं सपान मालिका  
Latest

‘तुजं माजं सपान’ मालिकेने गाठला २०० भागांचा टप्पा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका वेगळ्या धाटणीची कलाकृती व त्यातून जपली जाणारी सामाजिक आणि कौटुंबिक बांधिलकी यांचं उत्तम उदाहरण म्हणजे 'तुजं माजं सपान' ही सोनी मराठीवरील मालिका. प्रेक्षकांनी उचलून धरलेली ही गावाकडची गोष्ट त्यांना आपलीशी वाटण्याचं कारणच मुळात त्याच्या विषयात आहे. नावीन्यपूर्ण विषय आणि त्याला साजेशा कलाकारांची असलेली साथ, या मालिकेला उजवं ठरवते. मग ते कुठलंही क्षेत्र असो स्त्रिया आपली आवड आणि कर्तव्य यांची सांगड अगदी लीलया घालताना दिसतात. वेटक्लाऊड या निर्मितिसंस्थेच्या सोनी मराठी वाहिनीवरील 'तुजं माजं सपान' ही मालिका हीच बाब अधोरेखित करते आहे. सामान्य घरातील प्राजक्ताला रांगड्या मर्दानी खेळाचं, कुस्तीचं पडलेलं स्वप्नं आणि तिला पैलवान वीरूची असलेली भक्कम साथ यांची अनोखी कथा आपल्याला पाहायला मिळते आहे.

संबंधित बातम्या –

'तुजं माजं सपान' मालिकेने २०० भागांचा टप्पा पार केला आहे. वीरू आणि प्राजक्ता यांच्या आजवरच्या प्रवासात फार अडचणी आल्या. पण त्यांनी एकत्र येऊन त्या अडचांनींचा सामना केला. आता मालिकेने २०० भागांचा टप्पा पार केला. मालिकेच्या सेटवर याबद्दल आगळेवेगळे सेलिब्रेशन करण्यात आले. सेटवरील सगळ्या मंडळींनी चक्क रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान केले. प्राजक्ता आणि वीरू यांनी रक्तदान केले आणि हा २०० भागांचा टप्पा साजरा केला. नाशिक येथील सेटवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT