पाडळी ; पुढारी वृत्तसेवा पाडळी तालुका करवीर येथे कडबा घेऊन आलेल्या ट्रकचा तारेला स्पर्श झाल्याने ट्रकमधील कडबा अचानक पेटला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काही क्षणात आगीने उग्र रूप धारण केले. चालकाने प्रसंगावधानता दाखवत ट्रक एके ठिकाणी न थांबवता मोकळ्या माळावर आणला. या ठिकाणी फेऱ्या मारून त्यांनी काही कडबा कमी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
या घटनेची माहिती मिळताच बोन्द्रेनगर, पाडळी ग्रामस्थ या ठिकाणी दाखल झाले. अग्निशामन दलाचे पथकही काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्ध्या तासाचा अथक प्रयत्ना नंतर ट्रकमधील पेटलेला कडबा व इतर साहित्य बाजूला काढून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पाडळी गावातून सुमारे तीन किलोमीटर दूरवर हा ट्रक चालकाने निर्जन स्थळी आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा :