नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: दिल्ली मेट्रोमध्ये (Delhi Metro) आता दारूची बाटली घेऊन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने त्यांच्या सुधारित नियमांनुसार मेट्रोच्या आत प्रति व्यक्ती दारूच्या दोन सीलबंद बाटल्यांना परवानगी दिली आहे. परंतु, मेट्रोच्या परिसरात दारू पिण्यास बंदी असेल, असे एका अधिकाऱ्याने आज (दि.३०) स्पष्ट केले.
डीएमआरसीने एक निवेदन जारी केले की, आतापर्यंत एअरपोर्ट एक्स्प्रेस लाइन वगळता कोणत्याही दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सेवेमध्ये मद्य वाहून नेण्यावर बंदी होती. तथापि, CISF (सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) आणि DMRC च्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने यादीचे पुनरावलोकन केले. सुधारित यादीनुसार, दिल्ली मेट्रोला विमानतळ एक्सप्रेसप्रमाणेच मेट्रोमधून प्रति व्यक्ती सीलबंद दारूच्या २ बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
डीएमआरसीने मेट्रो प्रवाशांना प्रवास करताना शिष्टाचार राखण्याची विनंती केली आहे. एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, जर कोणी प्रवासी दारूच्या नशेत गैरवर्तन करताना आढळला. तर त्याच्यावर कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
हेही वाचा