Latest

Toyota Hybrid Car : प्रथमच धावणार भारतीय बनावटीची हायब्रिडकार, इलेक्ट्रिक आणि इथेनॉल दोन्हींवर धावणार

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Toyota Hybrid Car : प्रचलित डिझेल आणि पेट्रोल या पारंपरिक इंधनाला पर्याय शोधण्याच्या प्रयत्नांवर भारत सरकारचा वाढता विश्वास आहे. पेट्रोल आणि डिझेल या इंधनाची आयात कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्याद़ृष्टीने नितीन गडकरी, भूपेंद्र यादव आणि महेंद्रनाथ पांडे हे तीन केंद्रीय मंत्री प्रयत्नशील आहेत. त्यांनी इलेक्ट्रिक आणि 100 टक्के इथेनॉल अशा 'ड्यूअल' इंधनावर चालणार्‍या 'हायब्रीड' कारच्या उत्पादनाला हिरवा कंदील दाखवला आहे.

Toyota Hybrid Car : ऑटोमोबाईल क्षेत्रात नामांकित असणार्‍या 'टोयोटा' कंपनीने ही कार प्रायोगिक तत्त्वावर बाजारात आणली आहे. ड्युअल इंधनावर चालणारी 'फ्लेक्जिबल' कार असून ती फ्लेक्स फ्युएल आणि इलेक्ट्रिक वर चालते. ही दोन प्रकारे फायदेशीर आहे. त्यामुळे इथेनॉलचा वापर वाढणार आहेच शिवाय इंधनाची कार्यक्षमता वाढल्याने इंधन बचतही होणार आहे. प्रथमतः काही ठराविक काळ (चार्जिंग असेपर्यंत ) ही कार 'ई -व्ही' मोडवर चालेल. त्यानंतर इंजिन बंद झाल्यावर ही कार इथेनॉलमिश्रित पेट्रोलवर चालेल. हे मिश्रण 20 टक्के ते 100 टक्के पर्यंत असणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या धोरणानुसार भारतात प्रथमच ही कार प्रायोगिक तत्त्वावर लाँच केली आहे. खासगी वापरास ही कार प्रभावी ठरत असून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही नगण्य आहे. या कारमुळे इथेनॉलचा वाहनाचे इंधन म्हणून वापर करण्याला चालना मिळणार आहे.

Toyota Hybrid Car : प्रायोगिक तत्त्वावर या कंपनीने काही कार्स ब्राझीलमधून आयात केल्या आहेत. त्यांचा परफॉर्मन्स पडताळण्यासाठी भारताच्या विविध भागातून ही कार चालवून अभ्यास केला जाणार आहे.

Toyota Hybrid Car : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मते भारतात प्रदूषण ही फार मोठी समस्या असून वाहतूक क्षेत्र या प्रदूषणाचा प्रमुख भागीदार आहे. इथेनॉल आणि मिथेनॉल वर चालणार्‍या, कमी प्रदूषण करणार्‍या वाहनांचा वापर वाढणे आवश्यक आहे. या कारच्या वापरामुळे इथेनॉलच्या उत्पादनाला चालना मिळेल. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल. इंधनाची आयात कमी होऊन पेट्रोल व डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल. म्हणून इलेक्ट्रिक आणि इथेनॉल वर चालणार्‍या या हायब्रीड कारचा वापर क्रांती घडवून आणेल.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT