Top 3 CNG Cars 
Latest

भारतातल्या टॉप 3 सीएनजी कार : कमी किंमतीत जास्त मायलेज

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

भारतात सीएनजी कारची मागणी झपाटयाने वाढताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांचा सीएनजी कारकडे कल वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी कंपन्या भारतीय बाजरात लागोपाठ सीएनजी मॉडेल्स लाँच करीत आहेत. अनेक कंपन्या आपल्या एग्सिस्टिंग पॉप्यूलर मॉडेल्सला भविष्यात सीएनजी व्हेरियंट सोबत भारतात लाँच करीत आहेत. जाणुन घेऊयात भारतात कोणकोणत्या सीएनजी कार लाँच केल्या जाणार आहेत.

मारुती सुझुकी ऑल्टो

ही सध्या भारतातील सर्वात स्वस्त सीएनजी कार आहे. या कारची सुरुवातीची किंमत ४.८९ लाख रुपये आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही ही सीएनजी कार खरेदी करू शकता. तुमच्यासाठी हा स्वस्त ऑप्शन आहे. कंपनीने Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, फ्रंट पॉवर विंडो इत्यादी फिचर दिली आहेत.

मारुती सुझुकी एस-प्रेसो

मारुती सुझुकी एस प्रेसोचे सीएनजी व्हेरियंट असून याची सुरुवातीची किंमत ५.२३ लाख रुपये आहे. मारुतीची ही कार किमती सोबत एक जबरदस्त सीएनजी ऑप्शन आहे. मारुती एस्प्रेसोच्या फिचरबद्दल बोलायचे झाल्यास, यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेच्या कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

मारुती सुजुकी वैगनआर

मारुती वॅगनआर ही या यादीतील तिसरी परवडणारी कार आहे ज्याची सुरुवातीची किंमत 6.13 लाख इतकी आहे. मारुती सुझुकी वॅगनआरची BS VI S-CNG आवृत्ती देखील एक चांगला पर्याय आहे. CNG मध्ये मारुती WagonR चे मायलेज 32.52 kmpl आहे. कंपनीने आपले दोन मॉडेल सादर केले आहेत – WagonR S-CNG Lxi आणि WagonR S-CNG. मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी व्हेरियंटमध्ये 7 इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे.

यासोबतच यामध्ये अँड्रॉईड ऑटो अॅपल कार प्ले कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. याला व्होल्वो स्टाइलमध्ये टेल लाइट्स दिले आहेत. तसेच मागील बाजूस दिलेला काळ्या रंगाचा सी-पिलर रिअर विंडो टेलगेटला स्पर्श करतो. नवीन वॅगनआरचं डिझाइन बॉक्सी लुक मध्ये आहे. या कारच्या सीएनजी व्हेरियंटमध्ये तुम्हाला 1.0 लिटर इंजिन मिळेल. जे 5500 आरपीएम वर 68 पीएस पॉवर आणि 2500 आरपीएम वर 90 Nm टॉर्क जनरेट करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT