Latest

Tikhat Shev Recipe : दिवाळीची तिखट शेव कशी कराल? 

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव (Tikhat Shev Recipe), अनारसे, बाकरवडी अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास 'तिखट शेव' रेसिपी पाहूया…

साहित्य 

१) चार वाट्या हरभरा डाळीचे पीठ

२) एक चमचा तिखट

३) एक चमचा मीठ

४) एक चमचा ओव्याची पूड

५) अर्धा चमचा हिंग पूड

६) तळण्यासाठी तेल

कृती 

१) हरभऱ्याचे पीठ चाळून घ्या. ओवापूड, हिंग, तिखट, मीठ आणि पाव वाटी कडकडीत तेलाचे मोहन घाला.

२) पिठाचा अंदाज घेत पाणी टाकत ते हरभऱ्याचे पीठ चांगले मळून घ्या.

३) त्यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.

४) शेवच्या साच्यामध्ये पिठाचे गोळे घालून गरम झालेल्या तेलात हळूहळू शेव पाडा. पण, तेल हातावर उडणार नाही याची काळजी घ्या.

५) तेलातील शेवचा वरचा भागाचा रंग बदलला की, झाऱ्याने शेव उलटी करा. एक मिनिटभर भाजून झाल्यानंतर एक तुकडा हाताने मोडून तपासून पहा. जर मऊ वाटला तर पुन्हा थोडावर तेलात शेव तळा. अशाप्रकारे तुमची तिखट शेव (Tikhat Shev Recipe) तयार झाली आहे.

पहा व्हिडिओ : लोणच्याची ही रेसिपी एकदा ट्राय नक्की करा…

या रेसिपीदेखील वाचल्या का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT