पारगाव : पुढारी वृत्तसेवा : नागापूर ( ता .आंबेगाव ) येथील निकम पोहकर मळ्यात ऊसतोड सुरू असताना तीन बिबट बछडे आढळून आल्याची घटना सोमवारी (दि. १८ ) रोजी सकाळी दहा वाजता घडली. नागापूर गावठाणालगत निकम – पोहकर मळा आहे .तेथे हनुमंत आनंदा पोहकर यांच्या शेतात गेली चार-पाच दिवसांपासून ऊसतोड सुरू आहे.सोमवारी (दि. 18 ) ऊसतोड सुरू झाल्यानंतर काही वेळाने ऊसतोड कामगारांना एक बिबट बछडा आढळून आला.ऊसतोड कामगारांमध्ये घबराट पसरली त्यांनी ऊस तोडीचे काम त्वरित थांबवले. शेतकरी हनुमंत पोहकर यांना घटनेची खबर ऊसतोड कामगारांनी दिली .
पोहकर यांनी वनविभागाला ही घटना सांगितली . वळती बीटचे वनपरिमंडल अधिकारी प्रदीप कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सूर्यकांत कदम , वनसेवक महेश टेमगिरे , ऋषिकेश कोकणे, रेस्क्यू पथकाचे सदस्य दत्ता राजगुरू , विजय चासकर हे घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी ऊसतोड सुरू असलेल्या शेतात पाहणी केली तर आणखी दोन बिबट बछडे त्यांना आढळून आले. त्यांनी त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले. वनविभागाने तीनही बिबट बछड्यांना अवसरी घाटात सुखरूप पणे ठेवले आहे सोमवारी (दि. १८ ) सायंकाळी पुन्हा हे बछडे मादीच्या कुशीत सोडले जाणार असल्याचे वनपाल प्रदीप कासारे यांनी सांगितले .
हेही वाचा :