Latest

Jammu and Kashmir | कुपवाडामध्ये वाहन दरीत कोसळून तीन जवान शहीद

दीपक दि. भांदिगरे

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुपवाडामध्ये झालेल्या एका दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. माछल सेक्टरमध्ये (Machhal Sector Kupwara) गस्त घालत असताना जवानांचे वाहन खोल दरीत कोसळले. यामुळे तिघा जवानांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. माछल सेक्टरमधील फॉरवर्ड एरियामध्ये एक कनिष्ठ आयुक्त अधिकारी (जेसीओ) आणि दोन अन्य लष्करी जवान गस्त घालत असताना त्यांचे वाहन बर्फाच्छादित ट्रॅकवरून घसरले आणि ते दरीत कोसळले, असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेत नायब सुभेदार पुरषोत्तम कुमार, अमरिंक सिंह आणि अमित शर्मा शहीद झाले आहेत.

याआधी कुपवाडामध्येच नोव्हेंबरमध्ये ग्लेशियर कोसळून तीन जवान शहीद झाले होते. ही घटना माछल सेक्टरमध्येच घडली होती. जवान गस्त घालत असताना अचावक हिमनग कोसळला होता. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला होता. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या दिवसांत काश्मीरमधील (Jammu and Kashmir) तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले आहे. हिमवृष्टीमुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ३० जानेवारीपर्यंत येथे हिमवृष्टी कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कडक्याची थंडी आणि हिमवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT