Latest

‘तुमचा दाभोळकर करू’: ‘अंनिस’चे श्याम मानव यांना धमक्या, सुरक्षेत वाढ

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : भक्तांचे संकट, समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिव्य दरबार भरविण्याच्या दाव्यावरून बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना आव्हान दिले आहे. दरम्यान, श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

नुकतेच अंनिस विरोधात नागपुरातील संविधान चौकात आंदोलन झाले. हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर आल्या. दोन्ही बाजूने आव्हान-प्रति आव्हान देण्यात आल्यानंतर आता या धमकीने नागपुरात वातावरण अधिकच तापले आहे. श्याम मानव यांना "तुमचा दाभोळकर करू" अशी धमकी देण्यात आली आहे. तूर्तास ही धमकी नेमकी कोणाकडून देण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर हे धमकीचे मॅसेज करण्यात आले आहेत, अशी माहिती समितीचे नेते हरीश देशमुख यांनी दिली. यासंदर्भात पोलीस तक्रारही करण्यात आली आहे. सुरुवातीला श्याम मानव यांना दोन सशस्त्र जवानांची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. आता आणखी दोन सशस्त्र गनमॅन आणि तीन पोलीस कर्मचारी तैनात राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. "आज अकरा वाजेपर्यंत तुमची हत्या करु, तुमचा दाभोळकर करु", अशी धमकी मानव यांना देण्यात आली. यापूर्वीही मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला होता. श्याम मानव हे हिंदू धर्माच्याच विरोधात बोलतात व हिंदू धर्मालाच बदनाम करतात, असा आक्षेप हिंदुत्वादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून घेतला जात आहे.

श्याम मानव यांनी बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांना दिव्यशक्ती सिद्ध करून दाखविल्यास ३० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे आव्हान दिले आहे. मानव यांचे आव्हान स्वीकारल्याचा दावा बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी केला आहे. मात्र, हे आव्हान पत्रकारांसमोर नागपुरातच स्वीकारावे, असे मानव यांचे म्हणणे आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT