Latest

कोल्हापूर : पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर; 23 बंधारे पाण्याखाली

अनुराधा कोरवी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असून ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहे. तर यामुळे पंचगंगा पुन्हा एकदा पात्राबाहेर गेली आहे. बंगालच्या उपसागरासह ओडिशा व आंध्रप्रदेश किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांना एनडीआरएफच्या टीम सज्ज ठेवण्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात सोमवार ते गुरुवारपर्यंत चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात
आला आहे.बंगालच्या उपसागरात रविवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वार्‍याचा वेग ताशी ४० ते ६० कि.मी. वेगाने वाढला आहे. हा कमी दाबाचा पट्टा ओडिशासह आंध्रप्रदेश किनारपट्टीवरही सक्रिय आहे. त्याचे आगामी ४८ तासांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होत आहे. त्यामुळे सोमवार ते गुरुवारपर्यंत महाराष्ट्रासह अंदमान-निकोबार बेट, प. बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, पुद्दुचेरी, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, तेलंगण, मध्य प्रदेशसह १२ राज्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफची टीम सज्ज ठेवण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

या चार दिवसांत या सर्व राज्यांत १५० ते २०० मि.मी. पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच दरम्यान कोल्हापुरला सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने पंचगगेची पाणी पातळीतही पुन्हा वाढ झाली असून पुन्हा एकदा पात्राबाहेर गेली आहे. कोल्हापुरातील आजुबाजू परिसरातील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहे. पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT