goodbye trailer  
Latest

goodbye trailer : रश्मिका पहिल्या भेटीत अमिताभ बच्चन यांना बघून घाबरली अन् म्हणाली…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पा : द राईज या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना लवकरच पहिल्यादा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत आगामी 'गुडबाय' या चित्रपटात रश्मिका दिसणार आहे. 'गुडबाय' हा चित्रपट फॅमिली ड्रामा यावर आधारित असून रश्मिका आणि अमिताभसोबत नीना गुप्ता आणि सुनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका साकरल्या आहेत. नुकताच 'गुडबाय' चा ट्रेलर रिलीज ( goodbye trailer ) होताच चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले. या ट्रेलरमध्ये रश्मिका मंदान्ना अमिताभ बच्चनसोबत खूप वाद घालताना दिसली आहे. परंतु, जेव्हा खऱ्या आयुष्यात रश्मिका पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांनी भेटायला गेल्यावर घाबरली असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. याच दरम्यान अमिताभ यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या 'गुडबाय' च्या ट्रेलरमध्ये ( goodbye trailer) पहिल्यांदा बीग बींच्या केसांच्या पत्नी ड्राय करताना दिसली. यानंतर खूप वेळी बीग बी आणि रश्मिका याच्यात वाद घालताना दिसतेय. याच दरम्यान रश्मिकाच्या आईचे निंधन होते. यावेळी गातलेल्या जुन्या प्रथांना विरोध करताना रश्मिका दिसली आहे. यातून जोरदार वादाला सुरूवात होत असते असे दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात रश्मिका आणि बीग बींनी मुलगी आणि वडिलांची भूमिका निभावली आहे. परंतु, खऱ्या आयुष्यात रश्मिकाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचे अनेक रहस्य उघड केले.

वृत्तसंसथेला दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिका सांगितले आहे की, 'अमिताभ बच्चन यांनी मी पहिल्यांदा भेटायला गेले होते तेव्हा त्याची वाट पाहत केबिनच्या बाहेर उभी होते. याच दरम्यान अमिताभ आले आणि न पाहताच त्याच्या ऑफिसच्या केबीनमध्ये निघून गेले. यावेळी मला वाटले की. ते कामात बिझी आहेत. किंवा माझी त्यांनी भेटण्याची वेळ चुकीची आहे. यावेळी मी खूपच घाबरले होते. यानंतर पुढे होवून त्याच्याकडे गेले आणि माझे नाव रश्मिका. मी तुमच्या गुडबॉय चित्रपटात मुलीची भूमिका साकारणार असल्याचे म्हटलं.

पहिल्या भेटीवेळी मी खूप घाबरले होते कारण एवढ्या मोठ्या स्टारसोबत काम करणं ही खूपच कठीण होतं. सुरुवातीला ते खूप कडक होते, पण नंतर ते वडील आणि मुलीमध्ये चांगले नाते तयार झाले. या चित्रपटात काम करताना आमचे चांगले बॉन्डिंग चांगले झाले. यावरून अमिताभ एक खूपच छान व्यक्ती आहे. त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. 'असे रश्मिका मंदान्नाने म्हटले आहे.

रश्मिका मंदान्ना आणि अमिताभ बच्चन यांचा आगामी 'गुडबाय' हा चित्रपट ७ ऑक्टोबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर चाहत्यांच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT