Latest

जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण काय? समोर आली ही मोठी माहिती

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या अहवालातून मोठा खुलासा झाला आहे. सीडीएस हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागे खराब हवामान हे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल मानवेंद्र सिंग समितीने आपला अहवाल पूर्ण केला असून तो कायदेशीर सल्ल्यासाठी कायदेशीर शाखेकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच हा अहवाल हवाईदल प्रमुखांना सादर केला जाईल.

अहवालाबाबत अद्याप अधिकृत वक्तव्य नाही

या अहवालाबाबत हवाई दलाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणाचा शोध घेणाऱ्या समितीला असे आढळून आले आहे की, खराब हवामानामुळे वैमानिकांची दिशाभूल झाली असावी, ज्यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला सीफआयटी म्हणजेच 'Controlled Flight Into Terrain' म्हणतात. हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अपघातात 14 जणांचा मृत्यू

सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 14 जणांच्या मृत्यूनंतर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत की हवाई दलाचे 'Mi-17V5' हेलिकॉप्टर अपघातात कसे पडले? या अपघाताची चौकशी करण्यासाठी हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना केली होती, जेणेकरून अपघाताचे कारण स्पष्टपणे कळू शकेल.

चौकशी समितीने हवाई दल आणि लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. यासोबतच त्यांनी या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिक लोकांशीही चर्चा केली आहे. अपघातापूर्वी ज्या मोबाईलवरून व्हिडिओ शूट करण्यात आला होता, त्याचीही चौकशी करण्यात आली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा एफडीआर (फ्लाइट डेटा रेकॉर्डर) म्हणजेच ब्लॅक बॉक्सही जप्त करण्यात आला आहे. त्याचा डेटाही अहवालात समाविष्ट करण्यात आला आहे.

8 डिसेंबर रोजी सीडीएस जनरल बिपिन रावत तामिळनाडूतील सुलूर हवाई तळावरून IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरमधून उटीजवळील वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजला जात होते. त्यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT