पुढारी ऑनलाइन डेस्क – PFI पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, केंद्र सरकार यासाठी वेळ घेत आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी म्हटले आहे.
एनआयए आणि ईडी यांनी दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचा ठपका ठेवत संपूर्ण भारतातील 11 राज्यांमध्ये गुरुवारी छापे टाकले. या कारवाईत कर्नाटकातून PFI च्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले गुरुवारी, कर्नाटक पोलिसांनी 18 ठिकाणी शोध सुरू केला कारण राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) कथित दहशतवादी निधीवर PFI वर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली.
"तब्बल 15 लोकांना चौकशीसाठी उचलण्यात आले आणि NIA ने सात जणांना अटक केली. FIR नोंदवण्यात आली आहे. तसेच पुढील तपास चालू आहे. आमच्या पोलिसांनी देखील FIR नोंदवली आहे आणि चौकशी सुरू आहे," असे ते म्हणाले.
एनआयए आणि ईडीच्या संयुक्त कावाईवर अमित शहा यांनी उच्च स्तरीय बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सह अनेक अधिकारी उपस्थित होते. सरकारने कारवाई पूर्वी मोठ्या प्रमाणात डाटा एकत्रित केला. त्यानंतर संपूर्ण देशात पीएफआय कार्यकर्त्यांवर ही छापेमारी करण्यात आली.
हे ही वाचा :