Latest

Buldhana Bus Accident : बुलढाणा अपघातातील मृतांची नावे कळाली; पण मृतदेहांची ओळख पटेना

अविनाश सुतार

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा हाेरपळून मृत्‍यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेने समाजमन सुन्न झाले. दरम्‍यान, अपघातात जळून खाक झालेले सर्व २५ मृतदेह बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयाच्‍या शवागारात ठेवण्यात आले आहेत. विदर्भ ट्रैवल्स कंपनीने दिलेल्या सुचीनुसार मृत प्रवाशांची नावे कळाली असली तरी मृतदेहाची ओळख पटणे कठीण झाले आहे. या सर्व २५ मृतदेहांवर बुलढाणा येथेच रविवारी सामूहिक अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृत पावलेल्या व्यक्तींची यादी

तेजस पोकळे, तुषार ऊर्फ करण भूतनवरे, वृषाली वनकर,  शोभा वनकर, ओवी वनकर ( सर्व रा. चंद्रपूर )  ईशांत गुप्ता  ( नागपूर ), सृजल सोनोने ( यवतमाळ), तनिषा तायडे (वर्धा), तेजू राऊत (वर्धा), कैलास गंगावणे  ,कांचन गंगावणे , सई गंगावणे ( सर्व रा. पुणे ) संजीवनी गोठे ( वर्धा), सुशील खेलकर ( वर्धा ), गुडीया शेख , रिया सोनपुरे ,कौस्तुभ काळे ( सर्व रा. नागपूर), राजश्री गांढोळे (वर्धा ), मनीषा बहाळे ( वाशिम ), संजीवनी गोठे ( वर्धा), सुशील खेलकर ( वर्धा ), संजय बहाळे ( वाशिम ), राधिका खडसे, श्रेया वंजारी, प्रथमेश खोडे, अवंतिका पोहनकर ( सर्व रा. वर्धा ) निखिल पाते ( यवतमाळ ).

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट दिली तसेच जखमी व्यक्तींची रुग्णालयात भेट घेतली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT