पुढारी ऑनलाइन डेस्क : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आजाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव 'डेमोक्रेटिक आझाद पार्टी' आहे. जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाव जाहीर केले. आजाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेससोबतचे त्यांचे पाच दशकांहून अधिक जुने संबंध तोडले होते. ते रविवारी तीन दिवसांच्या दौऱ्यावर जम्मूत आले आहेत.
पक्षाची विचारधारा आपल्या नावासारखी असेल आणि सर्व धर्मनिरपेक्ष लोक त्यात सामील होतील, असे ते म्हणाले. त्यांनी पक्षाचा अजेंडा आधीच स्पष्ट केला आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे समाविष्ट आहे.
गुलाम नबी आजाद म्हणाले की, त्यांच्या नवीन पक्षासाठी उर्दू, संस्कृतमध्ये सुमारे 1,500 नावे पाठवण्यात आली आहेत. 'हिंदुस्थानी' हे हिंदी आणि उर्दूचे मिश्रण आहे. त्यांना हे नाव लोकशाही, शांततापूर्ण आणि मुक्त हवे आहे. जनतेने स्वतःच पक्षाचे नाव ठरवावे अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
2005 मध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री
गुलाम नबी आजाद यांच्या राजकीय कारकिर्दीतील सुवर्णकाळ 2005 मध्ये आला जेव्हा ते जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री होते. आजाद जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला. 2008 मध्ये अमरनाथ जमीन आंदोलनामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
हे ही वाचा :