रेणापुरचे श्री रेणुकादेवी मंदीर 
Latest

Navratri 2023 : भाविकांचे श्रध्दास्थान रेणापुरचे श्री रेणुकादेवी मंदिर; हलती दीपमाळ आकर्षण

निलेश पोतदार

रेणापूर , विठ्ठल कटके रेणापूरला ८०० वर्षापूर्वीचे ऐतिहासिक वारसा लाभलेले ग्रामदैवत श्री रेणुकादेवीचे हेमाडपंती, दगडी बांधकाम केलेले भव्य दिव्य मंदिर आहे. भाविक भक्तांच्या हाकेला धावून येणारी, त्यांची मनोकामना पूर्ण करणारी श्री रेणुका माता लाखो भाविक भक्तांचे एक मोठे श्रध्दास्थान आहे. ग्रामदैवत अदिशक्ती श्री रेणुका देवीच्या मंदीराची स्थापना कधी झाली हे निश्चीत सांगता येत नाही. मात्र या श्री रेणुकादेवी मंदीराचा उल्लेख संत नामदेव गाथेमध्ये पुढीलप्रमाणे आढळतो.

" रेणापूरी रेणुका, जमदग्नीसी भेटली देखा! तियेचे पोटी विश्वतारका परशुराम जन्मले !! "
जेंव्हा नव्हते चराचर ! तेंव्हा होते पंढरपुर,
त्याही अगोदर रेणापूर ! "

हे मंदीर ८०० वर्षांपेक्षाही पूर्वीचे असावे. असे सांगण्यात येते. पुर्वी भिंगरी या नावाने रेणापूरची ओळख होती, श्री रेणुका मातेच्या आगमनानंतर तिच्या नावानेच रेणापूर हे नाव पडले असावे. ८०० वर्षापूर्वी गावच्या पाटलांकडून श्री रेणुकादेवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्‍ठापना झाली. श्री रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी दंडकारण्याचा प्रदेश असलेल्या रेणापूर या गावात वास्तव्यास असल्याचे वर्णन मार्कडेंय पुराणात आढळते. ४०० वर्षापासून या मुर्तीची पुजाअर्चा करण्याचे काम येथील पुजारी बापू धर्माधिकारी यांचे वंशज करीत आहेत.

श्री रेणुकादेवी मंदीराचे बांधकाम १७ व्या शतकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले. त्यांनी मूर्तीचा गाभारा व सभामंडपाचे हेमंडपंती दगडी बांधकाम केले आहे. १९५० च्या कालावधीत मंदीराच्या समोर दगडी सभामंडपाचे बांधकाम याच गावातील हलकुडे परिवारांकडुन करण्यात आले आहे. १९६० च्या नतर गोविंददेव धर्मधिकारी यांनी श्री रेणुका देवीची पुजाअर्चा करण्याचे काम गुरवांच्या स्वधीन केले. आजही धर्मधिकारी व गुरव कुटूंब श्री रेणुकादेवीची सर्व पुजाअर्चा करीत आहेत. गेल्या चारशे वर्षांपासुन दत्ता गोंधळी परिवाराकडुन दररोज देवीच्या आरतीच्यावेळी संभळ वाजविला जातो. तसेच घडसे परिवार दररोज दुपारी बारा वाजता नित्यनेमाने चौघडा वाजवतात.

हलती दीपमाळ

५० फुट उंचीची दगड विटानी बांधलेली षटकोणी आकाराची "हलती दिपमाळ" ही या मंदीराचे वैशिष्‍ट्य आहे. वरच्या टोकावर तीन सिंहांची प्रतिकृती असुन, दिपमाळेला हलविण्यासाठी दिपमाळेवर चढावे लागते. दिपमाळ हलविणारा व्यक्ती वरच्या असलेल्या लोखंडी दोन्ही कड्यांना घट्ट पकडून या दिपमाळेला सहज हलवितो. दिपमाळ कशी हलते, कशामुळे हलते, याबाबत कसलीच माहिती उपलब्‍ध नाही.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT