कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांना आज कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि कन्नड चित्रपट उद्योगातील अनेक प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत अंतिम निरोप देण्यात आला. बंगळुरू येथील श्री कांतीरवा स्टुडिओमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना राजकीय सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला. यादरम्यान त्यांच्या लाडक्या कलाकाराला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे चाहतेही मोठ्या संख्येने जमले होते.
पुनित राजकुमार यांचे २९ ऑक्टोबरला हृदयाघाताने निधन झाले. पॉवरस्टार पुनीत राजकुमार यांचे चाहत्यांसाठी पार्थिव कंठीरवा स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दरम्यान राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या हजारो चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. वडील डॉ. राजकुमार यांच्या स्मारकाशेजारी पुनीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुनीत यांची मुलगी ध्रुती अमेरिकेहून दिल्लीला पोहोचली. तिथून ती बंगळूरला पोहोचली.
कन्नड चित्रपट अभिनेता राजकुमार यांचा हृदयघाताने मृत्यू झाल्यानंतर ही बातमी कळतचा काही वेळानंतर बेळगाव जिल्ह्यात त्याच्या दोन चाहत्यांचाही मृत्यू झाला.
एका चाहत्याला हृदयविकाराचा धक्का बसला, तर दुसर्या चाहत्याने आत्महत्या केली.
शिंदोळीमधील कनकदास नगरचा रहिवाशी परशुराम हणमंत देमण्णावर (वय 33) याला पुनीतच्या मृत्यूची बातमी समजताच तीव्र धक्का बसला आहे. टीव्हीवर राजकुमार यांच्या मृत्यूचे वृत्त पाहत असताना त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
परशुराम हा कुली काम करत होता. शिवराजकुमार आणि पुनीत राजकुमार यांचा मोठा चाहता होता.
अथणी तालुक्यातील युवा चाहत्याने आत्महत्या केली. राहुल गाडीवड्डर (वय 26) असे त्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी पुनीत राजकुमारच्या फोटोची पूजा करून राहुने आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांत झाली आहे.
लाडक्या अभिनेत्याच्या अचानक झालेल्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.