First Picture of the Black Hole at the Milky Way’s  
Latest

आकाशगंगेच्या हृदयातील गूढ उलगडले : ब्लॅक होलच्या अस्तित्वाची पुष्टी देणारे पहिले चित्र आले समोर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : आकाशगंगेच्या हृदयात असलेले गूढ अखेर उलगडले आहे. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत इव्हेंट होरायझन टेलिस्कोपच्या (EHT) खगोलशास्त्रज्ञांनी धनू राशी A* या आकाशगंगेच्या हृदयातील असलेल्या सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलची प्रतिमा प्रसिद्ध केली आहे. पण ही ब्लॅक होलची पहिला प्रतिमा नाही तर, यापूर्वी १० एप्रिल, २०१९ ला M87* ची पहिल्यांदा प्रतिमा प्रसिद्ध केली होती. धनू राशी A* हे सर्वात महत्त्वाचे सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आहे. हे होल म्हणजे एक स्थिर बिंदू आहे, ज्याभोवती आपली अवकाशगंगा भ्रमण करते.

फार पूर्वीपासून शास्त्रज्ञांनी असा विचार केला आहे की, सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल हे आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी लपलेले आहे. ज्याच्यामध्ये प्रचंड उलाढाल होत असते. अकाशगंगेत याभोवती असंख्य महाकाय ताऱ्याची गुंफण आहे. अनेक दशकांपासून, खगोलशास्त्रज्ञांना आश्चर्य वाटले आहे की आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी काय आहे, जे ताऱ्यांना त्यांच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने घट्ट कक्षेत आकर्षित करते. खगोलशास्त्रज्ञ रेनहार्ड गेन्झेल आणि अँड्रिया गेझ यांना धनु राशीच्या A* वरील त्यांच्या कार्यासाठी 2020 च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. या संशोधनामध्ये त्यांनी नमूद केले होते की, आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी सुपरमॅसिव्ह कॉम्पेक्ट ऑबजेक्ट आहे, पण हे ब्लॅक होल नाही.

इव्हेंट होरायझन टेलिस्कोपच्या (EHT) प्रकल्पाचे शास्त्रज्ञ जेफ्री बाऊर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या अभूतपूर्व निरिक्षणांमुळे आपल्या आकाशगंगेत (मध्यभागी) काय घडत आहे याबद्दलची आमची समज मोठ्या प्रमाणात सुधारली आहे आणि हे प्रचंड ब्लॅक होल त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाशी कसे संवाद साधतात याबद्दल नवीन अंतर्दृष्टी प्रदान केली आहे."

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT