कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आळसुंदे येथे दोन लहान चिमुरड्यांना जन्मदात्या बापानेच विहिरीत फेकून दिले. यात दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना रविवारी (दि. 6) सायंकाळी घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, आळसुंदे येथील गोकुळ जयराम क्षीरसागर (वय 38) याने त्याची इयत्ता दुसरीमध्ये शिकणारी मुलगी ऋतुजा (वय आठ) व मुलगा वेदांत (वय चार) यांना घरापासून सहाशे मीटरवर असलेल्या विहिरीवर नेले आणि उचलून विहिरीत फेकून दिले.
नंतर 'मुलांना मीच विहिरीत फेकले,' अशी माहिती त्यानेच गावातील नातेवाइकांना दिली. त्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिस व ग्रामस्थांनी तत्काळ चिमुकल्यांना विहिरीबाहेर काढले. मिराज पठाण यांनी रुग्णवाहिकेतून त्यांना अवघ्या काही मिनिटांतच कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी गोकुळ क्षीरसागरला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कर्जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
हेही वाचा :