निवडणूक  
Latest

कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबली

Shambhuraj Pachindre

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दि. 30 सप्टेंबरपर्यंत ब्रेक लागला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी शुक्रवारी (दि. 15) दुपारी याबाबतचे आदेश काढले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभर पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे.

पूर परिस्थितीत 1 जूनपासून आत्तापर्यंत 89 व्यक्ती व 181 प्राण्यांचे बळी गेले आहे तर 249 गावांना पावसाचा जबर फटका बसला आहे. त्याचबरोबर पावसामुळे राज्यातील 1368 घरांची पडझड झाली आहे. याठिकाणी खबरदारी म्हणून राज्य शासनाने एनडीआरएफची पथके तैनात करून मदतकार्य सुरू केले आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक रस्ते उखडले आहेत. काही मार्गावर पाणी आल्यामुळे मार्ग बंद झाले आहेत. परिणामी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे तर, आणखीन आठ ते दहा दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ त्याचबरोबर अनुकुल परिस्थिती नाही. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात 32 हजार 743 संस्था निवडणुकीस पात्र आहेत. यापैकी 7620 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यापैकी 5636 संस्थांची नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर 1984 संस्थांची प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर आहे. यातील बहूतांशी संस्था ग्रामीण भागातील आहेत. त्यांची सदस्य संख्याही मोठी असल्याने नियंत्रण ठेवणे जिकीरीचे बनले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक घेणे शक्य नसल्याने आहे. या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली असून 30 सप्टेंबर नंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. सध्या जिल्ह्यात अडीच हजार संस्था निवडणुकीसाठी पात्र आहेत. परंतु सहकार विभागाने पूर परिस्थितीमुळे निवडणुका थांबवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आदेशानंतर कार्यवाही सुरू करण्यात येईल.

अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT