Binge eating disorder  
Latest

Binge eating disorder : आजार… भुकेपेक्षा अधिक खाण्याचा!

मोहन कारंडे

– डॉ. मनोज कुंभार

अनेक शारीरिक समस्या केवळ अवेळी किंवा प्रमाणाहून अधिक खाल्ल्यामुळे उद्भवतात. 'बिंज ईटिंग डिसऑर्डर' ही अशीच एक समस्या होय. हा आजार जडलेल्या व्यक्ती आपल्या खाण्याच्या प्रमाणाकडेही लक्ष देत नाहीत आणि आपण काय खात आहोत, यावरही ते लक्ष केंद्रित करत नाहीत. हे लोक सामान्यतः एकटेच खातात, भूक नसतानाही खातात आणि आजार जडण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त खातात. त्यानंतर या लोकांना लाज, दुःख आणि ग्लानीची भावना घेरते. ही भावना इतकी टोकाला पोचते, की मग ही मंडळी आपले कुटुंबीय आणि मित्रांना कळू नये अशा प्रकारे लपूनछपून खातात. काही साधर्म्यस्थळे सोडल्यास हा आजार 'ब्युमिलिया'पेक्षा वेगळा आहे.

असा वाढतो त्रास

'बिंज ईटिंग डिसऑर्डर'ने ग्रस्त व्यक्तींमध्ये कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचा समावेश असू शकतो. परंतु महिला आणि किशोरावस्थेतील व्यक्तींचा समावेश या प्रकारात अधिक आढळतो. या आजारात स्थूलता वाढण्याबरोबरच रक्तदाब, मधुमेहासारखे 'लाइफस्टाइल डिसीज' होण्याचा धोका वाढतो.

या बाबी लक्षात घ्या

प्रमाणापेक्षा अधिक भोजन लागत असल्याची समस्या लक्षात येताच त्वरित डॉक्टरांना भेटावे. 'कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपी', 'इंटरपर्सनल थेरपी' किंवा 'डायलेक्टियल बिहेविअर थेरपी' अशा उपचारपद्धतींनी मनातील नकारात्मक विचार मोठ्या प्रमाणावर नष्ट करता येऊ शकतात. आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपले भोजन त्याच हिशेबाने करावे. औषधे वेळेवर घ्यावीत आणि औषधांचा कोर्स पूर्ण करावा. पचण्यास जड पदार्थ टाळून संतुलित आहार करावा. परिवारात पूर्वी कुणाला हा आजार झाल्याचा इतिहास असेल, तर डॉक्टरांशी त्याबद्दल आधीच बोलावे. स्वतःला कोणत्यातरी रचनात्मक कामात गढून घ्यावे. वेगवेगळे क्लासेस लावावेत.

आजाराचा मुकाबला

अधिक भोजन करावे लागणे ही समस्या शारीरिक वाटत असली, तरी ती मानसिक कारणांमुळे उद्भवलेली असते. त्यामुळे या समस्येचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात मनापासूनच करावी लागते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT