पुणे : पुणे शहरातील पूर पूरस्थितीचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये संभाव्य पुराची धोक्याची 23 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. संभाव्य पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करावे लागणारी शहरात दहा ठिकाणे आहेत.
जिल्हा प्रशासनाने शहरातील भुयारी मार्ग, पावसाळ्यात बाधित होणारे पूल यांची यादीही जाहीर केली आहे. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून विसर्गाचे प्रमाण 40 हजार क्युसेक वेगाने असल्यास सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. विसर्गाचे प्रमाण 50 हजार क्युसेकपर्यंत गेल्यास संबंधित भागातील नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे.
त्यानुसार दिवणी मेटल वर्कस एरंडवणा, खिलारेवस्ती, पुलाची वाडी डेक्कन जिमखाना, पीएमपी आगार डेक्कन जिमखाना मागील बाजू, तोफखाना परिसर आणि कामगार पुतळा शिवाजीनगर, पूना रुग्णालयालगतचा भाग, सीताबाग कॉलनी व अष्टभुजा मंदिर नारायण पेठ, अमृतेश्वर मंदिराजवळील भाग शनिवार पेठ, ओटा घाट, नेने घाट, शेख सल्ला दर्गा, डेंगळे पूल कसबा पेठ, बारणे रस्ता मनपा वसाहत, गाडीतळ झोपडपट्टी, ताडीवाला रस्ता झोपडपट्टी परिसर आणि आंबिल ओढालगतचा भाग यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, तर कोंढवे-धावडे, भीमनगर, समाज मंदिर ओढ्यालगतचा भाग, न्यू कोपरे हद्दीजवळ, उत्तमनगर इंदिरा वसाहत, शिवणे नदीलगतचा भाग, वारजे तपोधाम, नांदेड नदीलगतचा भाग, वडगाव बुद्रुक सर्वे. क्र. 14 व 15, हिंगणे खुर्द सर्वे क्र.18, अलंकार पोलिस चौकीजवळील भाग कर्वेनगर रस्ता, दत्तवाडी व राजेंद्रनगर या भागातील नागरिकांना कदाचित स्थलांतरित करावे लागणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे. दरम्यान, मॉडर्न भुयारी मार्ग, वाकडेवाडी भुयारी मार्ग, हॅरिस बि—ज सीएमईकडे जाणारा मार्ग, दत्तनगर भुयारी मार्ग हे भुयारी मार्ग बाधित होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: