Latest

Raju Srivastav : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या आठवणीने मुलगी अंतरा भावूक, म्हणाली…

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: कॉमेडीमधील दिग्गज कलाकार राजू श्रीवास्तव हे आता आपल्यात नाहीत. बुधवारी सकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते गेल्या एक महिन्यापासून ते हॉस्पिटलमध्ये होते. देशभरातील त्यांचे चाहते ते लवकर बरे होतील, या आशेने प्रार्थना करत होते. पण या सगळ्यांची निराशा करत, अखेर राजू श्रीवास्तव हे कायमचे हे जग सोडून गेले. त्यांच्या निघून जाण्याने बातमीने देशभरात दु:खाची लाट पसरली. यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी येथील प्रत्येकाच्‍या पापण्या पाणावल्या होत्या.

राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याचे कलाकार क्षेत्राबरोबरच त्यांच्या कुटूंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजू यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी अंतरा हिने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'Raju bai, Ye kya baat huai, तू चांगला लढलास, आता तू शांत विश्रांती घे'. आज आपण ग्रेट कलाकाराला आणि एका चांगल्या माणसाला गमावले आहे, असेही म्हणत तिने तिच्या वडिलांना श्रध्दांजली वाहिली आहे. राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांचेही तिने पोस्ट करत आभार मानले आहेत.

राजू श्रीवास्तवची मुलगी अंतरा हिने बुधवारी रात्री उशिरा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही मेसेजसह फोटोह शेअर केले आहेत. यावर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूवर अनेक बॉलीवूड कलाकार, सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्तींनी दु: ख व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT