तासगाव; पुढारी वृत्तसेवा : भिवघाट रस्त्यावरील बलगवडे गावच्या हद्दीत ३० ते ३५ वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. दुसरीकडे या तरुणाचा खून करून मृतदेह बलगवडे येथील खाणी शेजारील रस्त्यावर आणून टाकल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
धारधार शस्त्राने तरुणांचा गळा चिरला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या मृत तरुणांची अद्याप ओळख पटलेली नाही. बलगवडे परिसरातील हा तरुण नसल्याची माहिती पुढे येत आहे. तरूणाचा अन्यत्र खून करून, मृतदेह या ठिकाणी टाकला असावा, अशी घटना स्थळी चर्चा सुरू आहे.