पुढारी ऑनलाईन डेस्क: सिद्धार्थ आनंद, हृतिक रोशन, अनिल कपूर आणि दीपिका पादुकोण यांचा आगामी 'फायटर' ( Fighter Film ) चित्रपट गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. याच दरम्यान 'फायटर' चित्रपटातील कलाकारांनी वायुसेना दिनाचं औचित्य साधत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यातून खास करून भारतीय वायुसेनेच्या योद्ध्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
संबधित बातम्या
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांच्या इंन्स्टाग्रामवर 'Air Force Day' म्हणत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'ते अभिमानाने आणि गौरवाने आकाशात उंच भरारी घेतात आणि आपल्या देशाची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अटूट वचन देतात. या वायुसेना दिनी टीम #Fighter आमच्या वैभवशाली भारतीय वायुसेनेच्या योद्ध्यांना सलाम करते'. ही खास पोस्ट प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे. फोटोतील दृश्य सुंदरपणे टिपले आहे.
'फायटर' ची उत्सुकता वाढली असून चाहते त्याच्या रिलीज डेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'फायटर' मध्ये हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. Fighter Film हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार असून सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे.
हेही वाचा :