पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील ठाण्यातील लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या सात झाली आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेने आज (दि.११) दिली. महेंद्र चौपाल (वय.३२), रुपेश कुमार दास (वय. २१), हारून शेख (वय. ४७), मिथलेश (वय. ३५), करिदास (वय. ३८) आणि सुनील कुमार दास (वय. २१) अशी मृतांची नावे आहेत. सातव्या मृताची अद्याप ओळख पटलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Thane Lift Accident Update)
माहितीनुसार, ठाण्याच्या बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून रविवारी (दि.१०) सायंकाळी कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले.बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झाले होते. या दोघांचाही मृत्यू झाला. एकुण मृतांचा आकडा सात झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिफ्टमध्ये एकूण सात मजूर होते आणि त्या सर्वांना मृत घोषित करण्यात आले आहे. महेंद्र चौपाल (वय.३२), रुपेश कुमार दास (वय. २१), हारून शेख (वय. ४७), मिथलेश (वय. ३५), करिदास (वय. ३८) आणि सुनील कुमार दास (वय. २१) अशी मृतांची नावे आहेत. सातव्या मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा