पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये दोन बाहेरील मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दोन्ही जखमी नागरिकांना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. शोध मोहिमेसाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. (Jammu and Kashmir)
दरम्यान, दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पुंछमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या मोठ्या कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा मंगळवारी (दि.१७) केला. पुंछमधील सिंधरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ही चकमक झाली. त्याचबरोबर बडगाममध्ये पोलिसांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना एलईटीशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडुन काही साहित्य जप्त केले आहे. मुश्ताक अहमद लोन, अझहर अहमद मीर, इरफान अहमद सोफी आणि अबरार अहमद मलिक अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. जप्त केलेले सर्व साहित्य पुढील तपासासाठी केस रेकॉर्डमध्ये घेण्यात आले आहे. (Jammu and Kashmir)
हेही वाचा