पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून तेलंगणात सत्तेत असलेले टीआरएस सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे के. चंद्रशेखर राव म्हणाले आहेत. ते मुनुगोडे मतदारसंघातील प्रचार रॅलीमध्ये बोलत होते.
चंद्रशेखर राव म्हणाले, दिल्लीतून भाजपचे लोक तेलंगणात दाखल झाले आहेत. आमदारांना कोट्यावधी रूपयांची आश्वासने दिली जात आहेत. तेलंगणातील आमदार अशा आश्वासनांना बळी पडणार नाहीत. ते या भूमीचे सुपूत्र आहेत. त्यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला असल्याचे राव यावेळी म्हणाले. भाजप टीआरसचे २० ते ३० आमदार खरेदी करू पहात आहे. केसीआर सरकार पाडण्याची भाजपची इच्छा आहे. ते तेलंगणात अतिक्रमण करू पहात आहेत. कारण त्यांना तेलंगणातही अतिक्रमण करत खासगीकरण लागू करायचे आहे, असेही राव यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुन्हा भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. सिसोदिया म्हणाले, दिल्लीत ऑपरेशन लोटसला अपयश आल्यानंतर भाजपने तेलंगणामध्ये प्रयत्न सुरू केले आहेत.