actress Tejaswini Pandit new series  
Latest

‘अनुराधा’ वेबसिरीज : अखेर ‘बॅन लिपस्टिक’चा उलगडा झाला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क :  काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही' असे म्हणत अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत 'बॅन लिपस्टिक'चा संदेश देत होत्या. हे नक्की काय प्रकरण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अभिनेत्रींच्या या अशा व्हिडीओमुळे लोकांच्या मनात संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली होती. लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. अखेर या प्रश्नाचा उलगडा झाला असून त्याचे कारण आपल्या समोर आले आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'अनुराधा' ही ७ भागांची वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आलीय. 'अनुराधा' व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि त्याच्याच प्रमोशनचा हा एक भाग होता.

या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आता या सर्व अभिनेत्री लिपस्टिकचे समर्थन का करत नाही, लिपस्टिकचा आणि या वेबसिरीजचा काय संबंध, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसिरीजमध्ये दडलेली आहेत.

नुकताच या वेबसिरीजच्या पोस्टर आणि टिझर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. टिझरमध्ये तेजस्विनीचा बोल्ड अंदाज दिसत असून तिच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दिसत आहेत. हे रहस्य काय आहे, हे लवकरच आपल्या समोर येईल.

'अनुराधा' या सीरीजच्या निमित्ताने संजय जाधव वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण करत आहेत. हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या वेबसीरिजचे लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचे असून पंकज पडघम यांचे संगीत लाभले आहे. तर संकलनाचे काम अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी पाहिले असून कला दिग्दर्शक सतीश चिपकर आहेत.

आपल्या या पहिल्या प्रोजेक्टबाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, '' आजवर अनेक चित्रपट केले आहेत प्रथमच वेबसीरिज करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यासाठी उत्सुकही आहे. एकंदरच संमिश्र मनःस्थिती आहे. आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या आवडत्या टीमसोबत मी नवीन प्रोजेक्ट करतोय. आशा आहे प्रेक्षकांना माझा हा नवा प्रयत्न नक्कीच आवडेल.''

वेबसिरीजबाबत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " ही वेबसिरीज थोडीशी वेगळी आहे. याचा जॉनर सस्पेंस आणि थ्रिलर असून संजय जाधव सारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने याचे दिग्दर्शन केले आहे. यातील नाट्यथरार प्रेक्षकांना स्तब्ध करणारा असून अतिशय वेगळ्या पद्धतीने याचे प्रमोशन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या वेबसिरीजमध्ये नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली. या वेबसिरीजमध्ये लिपस्टिकची नक्की काय भूमिका आहे, यासाठी प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर ही वेबसिरीज पाहावी लागेल. अशा अनेक नवनवीन आणि उत्तमोत्तम वेबसिरीज आम्ही प्रेक्षकांसाठी आगामी काळात घेऊन येणार आहोत."


.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT