Latest

Lok Sabha Election : लोकसभेसाठी भाजपचे घोषवाक्य ठरलं!; ‘तिसरी बार मोदी सरकार’, अबकी बार 400 पार’

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवे घोषवाक्य तयार केले आहे. या निवडणुकीत भाजप 'तिसरी बार मोदी सरकार', अबकी बार 400 पार', असा नारा देणार आहे. आज (दि.२) दिल्लीत भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीत याबाबत घोषणा करण्यात आली. Lok Sabha Election

भाजपने राज्य, लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील संयोजक आणि सहसंयोजकही निश्चित केले आहे. या निवडणुकीत भाजप महिला मतदार आणि तरुणांवर भर देणार आहे. प्रथमच मतदानासाठी जाणाऱ्या अशा मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. भाजप सोशल मीडियावरील प्रचारालाही गती देणार आहे. Lok Sabha Election

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच संपूर्ण भारताचा दौरा करणार आहेत. यासोबतच गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हेही वेगवेगळ्या वेळी देशाच्या विविध भागांना भेटी देणार आहेत. 22 जानेवारीनंतरही पंतप्रधानांचा हा दौरा सुरू होणार आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT